Budget News: "4 वर्षांपर्यंत अपडेटेड टॅक्स रिटर्न भरता येणार ; मर्यादा वाढवली" : निर्मला सीतारमण
आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर केले. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पुढची 5 वर्षे विकासाची संधी देणार असं म्हटलं आहे. या अर्थसंकल्पात अनेक मुद्दे मांडण्यात आले.
याचपार्श्वभूमीवर नवीन आयकर विधेयकामुळे गुंतागुंत कमी होणार असून टीडीएसमध्ये सुलभता आणणार आहे. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा 1 लाखांपर्यंत वाढवली. रिटर्न न भरलेल्यांसाठी मर्यादा ४ वर्षांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पातून 4 वर्षांपर्यत अपडेटेड टॅक्स रिटर्न भरु शकता अशी घोषणा केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केलेली आहे. ज्यांना कर भरता येणार नाही त्यांना मोठा दिलासा यावेळी मिळत आहे. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात वाढ करणं हे नव्या विधेयकाचं उद्दिष्ट आहे.